संजयभाऊ राठोड यांच्या मातोश्रींच्या प्रेरणेने सुरू झालेली ही योजना ग्रामीण व बंजारा समाजातील नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधीसाठी सक्षम करून आत्मविश्वासाचे बळ देणारी मायेची पांघरूण आहे.
सन 2024 मध्ये ही योजना प्रथम दिग्रस, दारव्हा व नेर तालुक्यात सुरु करण्यात आली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या विद्यर्थ्यांसाठी या योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे.पारदर्शक प्रक्रिया व गुणवत्तेच्या आधारे आजपर्यंत सुमारे २०००० विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली गेली आणि अनेकांना संधी मिळाली.
बंजारा समाजातील सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी खुली.
शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक गरज व सामाजिक भान यांना प्राधान्य.
विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, प्रगतीची संधी व आत्मविश्वास देणारा उपक्रम.
आता शिष्यवृत्ती योजना संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजासाठी खुली केली गेली आहे.
निवड प्रक्रियेत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
गरीब,होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात व्यत्यय येऊ नये यासाठी योग्य आर्थिक पाठबळ प्रदान केले जाते.
बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लक्ष देऊन त्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी कार्य.