लातूर येथील वाडा बँक्वेट हॉलमध्ये बंजारा समाजातील लेखक बळीराम रूपचंद जाधव लिखित “गोरमाटी भास्या सब्दकोस” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधत बंजारा समाजाची भाषा, संस्कृती आणि परंपरा जतन करण्याच्या दृष्टीने या साहित्यकृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
तसेच बंजारा समाजाच्या विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची तसेच सोडविण्यात आलेल्या प्रश्नांची माहिती यावेळी दिली. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असून आगामी काळातही विकासाभिमुख ठोस प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, याची ग्वाही दिली.
यावेळी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, महंत शेखर महाराज, गोरसिकवाडीचे राष्ट्रीय संयोजक आशिष चव्हाण, साहित्यिक प्रा. डॉ. गणपत राठोड, सेवानिवृत्त तहसीलदार एल. टी. चव्हाण तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, बंजारा समाजातील बांधव, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4 वाचन
0 पसंती