सर्व लेख
व्हिडिओ

श्री संत सेवालाल महाराज २८७ वी जयंती | भव्य बंजारा महामेळावा व लेंगी स्पर्धा | बीड

09-03-2026 Shubham
संत श्री सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त काठोडा (जि. बीड) येथे आयोजित बंजारा महामेळावा, भव्य लेंगी स्पर्धा आणि बंजारा सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहिलो.

या प्रसंगी संत सेवालाल महाराज, माता जगदंबा देवी व रामराव महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तसेच समाजबांधवांशी संवाद साधला. पारंपरिक लेंगी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून बंजारा समाजाची समृद्ध परंपरा आणि संस्कृती अनुभवण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमास महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज, आमदार विजयसिंह पंडित, महंत सुंदरसिंग महाराज तसेच बंजारा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📍 काठोडा, जि. बीड जय सेवालाल!
3 वाचन 0 पसंती