सर्व लेख
व्हिडिओ

बंजारा समाजातले नेते Vansantrao Naik जे सलग 11 वर्ष मुख्यमंत्री राहिले होते,शेतकऱ्यांसाठी लढलेला नेता

20-09-2026 Sarkarnama News Channel
शेतकऱ्यांची ही परिस्थिती बदलली नाही तर शनिवारवाड्यासमोर फाशी घेईल’ अशी घोषणा निवडणुकीपूर्वी एका मुख्यमंत्र्यांनी केली होती आणि जे बोलले ते त्यांनी करूनही दाखवलं. हरितक्रांती घडवली, कापूस एकाधिकार योजना आणली, सिलिंग कायदा आणला, ७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजना आणली आणि कित्येक शेतकऱ्यांचे परिवार जगवले, चक्क ४ कृषी विद्यापीठांची स्थापना केली. म्हणून जनतेने त्यांना एवढं डोक्यावर घेतलं कि त्यांनी सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असण्याचा रेकॉर्डच बनवला. ते सलग 11 वर्ष, 2 महीने आणि 18 दिवस मुख्यमंत्री होते. बंद गळ्याचा सूट, चश्मा, तोंडात पाइप, पण मनात शेतकऱ्यांविषयी आणि मातीविषयी न मावळणारं प्रेम, ज्यांचं नाव होतं वसंतराव नाईक. आज त्याच वसंतपर्वाचे किस्से ऐकुया डिटेलमध्ये…
6 वाचन 0 पसंती